Ad will apear here
Next
‘जिजाऊ ग्रंथालयाने दिलेल्या संधीचा लाभ मुलांनी घ्यावा’


पुणे : ‘आपली मुले शिकली पाहिजेत. त्यासाठी त्यांनी वाचले पाहिजे. जिजाऊ ग्रंथालयाने जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्याचा फायदा मुलांनी घ्यावा. मुले शिकली, तरच आपण करत असलेले काम त्यांच्या हातून सुटेल व ती चांगल्या हुद्द्यावर काम करतील,’ असे प्रतिपादन पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले.

शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय आयोजित जिजाऊ ग्रंथालय वर्धापनदिनानिमित्त वाचक मेळावा व पुणे मनपा सफाई कामगारांचा दिवाळीनिमित्त सत्कार समारंभ धनत्रयोदशी दिनी (पाच नोव्हेंबर) झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव, कस्तुरबा सोसायटीचे सेक्रेटरी विष्णू आगरवाल, संचालक अनिल यादव, जिजाऊ ग्रंथालय कार्यवाह नूतन चिंचणे, खजिनदार शैलेश मोळक, सदस्य शिल्पकला रंधवे, कैलास वडघुले, कांचन जुन्नरकर, मैथिली मोळक, वर्षा माळवदे, छाया सातभाई आदी मान्यवर उपस्थित होते.

आपले रियल हिरो सफाई कामगार.. करूया त्यांचा सन्मान’ या हेतूने गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय राबवत आहे. महिलांना साडी-चोळी, तर पुरुष कर्मचाऱ्यांना शर्ट-पॅंटपीस व दिवाळी फराळाचे वाटप करून प्रतिवर्षी कृतज्ञता व्यक्त केली जाते. या वर्षी सुमारे ६५ कामगारांचा सत्कार करण्यात आला.



डॉ. धेंडे म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे बहुजनांची स्थिती बदलू लागली. इतर गोष्टीत गुंतण्यापेक्षा यांचे विचार आपण वाचले पाहिजेत.’

प्रारंभी पूर्वल खरात यांनी ‘कामगारांचे जीवन’ या विषयावर कविता सादर केली. सर्व उपस्थितांनी कवितेला दाद दिली. या वेळी स्वराज चॉकलेटचे संचालक अनिल ढगे यांनी सर्व कामगारांना चॉकलेटचे वाटप केले. ॲड. शैलजा मोळक यांनी संस्थेच्या सर्व उपक्रमांची माहिती देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रज्ञेश मोळक यांनी केले. कैलास वडघुले यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZWEBU
Similar Posts
‘संविधान हे राजकीय नव्हे, तर जगण्याचे साधन’ पुणे : ‘सत्तेचा उपयोग करून सामाजिक कायदे करून परिवर्तनीय बदल करणारा माणूस म्हणजे राजर्षी शाहू महाराज. सत्तेत संवेदनशीलता दाखवली पाहिजे. संविधान ही आपली सत्ता आहे. संविधान हे राजकीय साधन नव्हे, तर आपल्या जगण्याचे साधन आहे. किती जणांनी एकत्र बसून यावर चर्चा केलीय किंवा करतात,’ असे प्रतिपादन सम्यकचे कार्यकारी संचालक आनंद पवार यांनी केले
‘विश्वसम्राट बळीराजाचे पूजन व स्मरण करणे कर्तव्य’ पुणे : ‘बहुजन समाजाच्या दृष्टीने दिवाळीतील सर्वांत मंगलमय, स्फूर्तीदायक, सर्वांत महत्त्वाचा व आनंदाचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदेचा हे आम्ही आज अभिमानाने सांगतो. विश्वसम्राट बळीराजा हा आपला राजा असून, त्याचे पूजन व स्मरण करणे आपले कर्तव्य आहे,’ असे प्रतिपादन विचारवंत प्रा. प्रतिमा परदेशी यांनी केले.
उपमहापौरांच्या पुढाकाराने विजयस्तंभ परिसराची स्वच्छता पुणे : कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभास शौर्यदिनानिमित्त एक जानेवारी २०१९ रोजी अभिवादन करण्यासाठी लाखो भीमसैनिक आले होते. अतिशय शांततेत हा अभिवादन सोहळा पार पडला. मानवंदना दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दोन जानेवारीला पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पुढाकार घेऊन विजयस्तंभ परिसराची स्वच्छता केली
सफाई कामगारांना दिवाळी निमित्ताने भेट पुणे : नागरिकांचे आणि पर्यायाने शहराचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सातत्याने झटणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना पुण्यातील महर्षी व्यास प्रतिष्ठानतर्फे दिवाळीनिमित्ताने भेटवस्तू देण्यात आल्या. कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सफाई कामगारांना या भेटवस्तूंचे वाटप खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language